- October 14, 2022
- No Comment
किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार
पिंपळे निलख: पायी जात असताना तीन ते चार जणांच्या टोळक्यांनी रागाने का बघतो म्हणून तरुणावर कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केले आहे. हा प्रकार पिंपळे निलख येथे घडली आहे.
चैतन्य राजू आहिरे (वय 19 रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संकेत थोरात उर्फ बाळ्या, तेजस शिंदे, करण शेळके उर्फ बाब्या, बंड्या (पुर्ण नाव माहित नाही) यातील संकेत व बंड्या यांना केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जेवून घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवून तू तेजस शिंदे याच्याकडे रागाने का बघतोस अशी विचारणा करत कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. तसेच, हाताने मारहाण करत फिर्यादीचे दात पाडले.
यात फिर्यादी यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली आहे. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.