वाहतूक पोलिसाला लाच घेताना रंगेहाथ पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभाची कामगिरी
- क्राईम
- September 8, 2022
- No Comment
चाकणः कारवाई न करता गाडी परत देण्यासाठी 7 हजाराची लाच स्वीकारताना चाकण वाहतूक पोलिसाला मंगळवारी (दि.6) रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
चाकण वाहतूक विभागातील पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब अंबादास जायभाय (वय 32) व खासगी मदतनीस किशोर भगवान चौगुले (वय 43) अशी अटक आरोपींची नवे आहेत.या प्रकरणी 22 वर्षीय तरुणाने तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण वाहतूक विभागाने कारवाईसाठी तक्रारदार यांची दुचाकी ताब्यात घेतली होती. कारवाई न करता दुचाकी देण्यासाठी जायभाय याने 10 हजार रुपयांची मागणी केली.तडजोडी अंती 7 हजार देण्याचे ठरले.ही 7 हजार रुपयांची लाच घेताना पोलिसांनी जायभय व त्याचा मदनिस चौगुले याला अटक केली आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यावेळी सापळा अधिकारी व तपास अधिकारी म्हणून सहायक पोलिस आयुक्त शीतल घोगरे या काम पहात आहेत.