• November 22, 2022
  • No Comment

पेट्रोल पंपावरील नऊ लाखांची रोकड चोरीला

पेट्रोल पंपावरील नऊ लाखांची रोकड चोरीला

     

    चिंचवड: पेट्रोल पंपावर जमा झालेली सुमारे 9 लाखांची रोकड चोरीला गेली. ही घटना पूर्णानगर, चिंचवड येथे भोसले पेट्रोल पंपावर घडली.

    विशाल जगन्नाथ भोसले (वय 38, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पूर्णानगर येथे पेट्रोल पंप आहे. दिवसभर पेट्रोल पंपावर जमा झालेली नऊ लाख 99 हजार 936 रुपयांची रोकड त्यांनी ऑफिसमधील ड्रॉवरमध्ये ठेवली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने ड्रॉवरमधून चावी घेत त्यातील आठ लाख 93 हजार 136 रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *