• November 22, 2022
  • No Comment

बार व क्लबवर पोलिसांचा छापा, पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाची कामगिरी

बार व क्लबवर पोलिसांचा छापा, पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाची कामगिरी

     

    बंडगार्डन: पुण्यातील बंडगार्डन परिसरात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डिजे सिस्टिम लावून ध्वनी प्रदुषण करणाऱ्या ‘One8 कम्यून बार’ One 8 व ‘मिलर्स लक्झरी क्लब’वर कारवाई करण्यात आली आहे.
    ही कारवाई पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली.

    सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक बंडगार्डन परिसरातील राजा बहादुर मिल येथील ‘One8 कम्यून बार’ व ‘मिलर्स लक्झरी क्लब’ येथे मोठ्या आवाजात सांउड सिस्टिमवर संगीत वाजवले जात असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. व त्या ठिकाणी छापा टाकला असता मोठ्या आवाजात संगीत सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही हॉटेलमधील एक लाख 70 हजार रुपये किंमतीचे सांउड सिस्टिम जप्त केले आहे. पोलिसांनी हॉटेलवर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत ध्वनी प्रदुषण अधिनियमानुसार कारवाई केली. जप्त केलेला मुद्देमाल बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहे.

    सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाब कर्पे, मनिषा पुकाळे, इरफान पठाण, संदीप कोळगे यांच्या पथकाने केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *