• October 1, 2022
  • No Comment

जमिन खरेदी केली म्हणून दोन महिला व ज्येष्ठ नागरिकाला मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

जमिन खरेदी केली म्हणून दोन महिला व ज्येष्ठ नागरिकाला मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    भोसरी: जमीन का खरेदी केली म्हणून पाच जणांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने दोन महिला व ज्येष्ठ नागरिकाला मारहाण कऱण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी गोरखनाथ बाळासाहेब सस्ते (वय 39 रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विष्णू बाबूराव सस्ते (वय 55),शिवाजी बाबूराव सस्ते (वय 57),दिगंबर शिवाजी सस्ते (वय34),अक्षय ऊर्फ आकाश सस्ते (वय 26) व रविंद्र मारूती सस्ते (वय 45) सर्व राहणार मोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी एका महिलेकडून मोशी येथील गट क्रमांक 244 मध्ये 15 गुंठे जमीन घेतली. याचाच राग मनात धरून तुम्ही ती जमीन का खरेदी केली म्हणून आरपींनी फिर्यादी यांचे वडील बाळासाहेब दशरथ सस्ते, फिर्यादी यांची पत्नी व बहिण यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. यावेळी फिर्यादीच्या वहिलांना लाकडीकाठीने मारून तू जागा कशी खरेदी करतो म्हणून हातावर व छातीवर मारहाण करत जखमी केले.यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *