• November 4, 2022
  • No Comment

महिलेकडून कर्जाची अवाजवी परतफेड मागत तिला जिवे मारण्याची धमकी देणार जोडप गजाआड

महिलेकडून कर्जाची अवाजवी परतफेड मागत तिला जिवे मारण्याची धमकी देणार जोडप गजाआड

    पुणे: तक्रारदार महिलेकडून कर्जाची अवाजवी परतफेड मागत तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक 1 यांनी गुरुवारी (दि.3) रोजी केली आहे.

    जयराम निवृत्ती पोकळे (वय 43) व पत्नी हेमा उर्फ रेखा जयराम पोकळे (वय 36) (दोघे राहणार धायरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.त्यांच्यावर सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला आरोपींनी फर्निचर व्यवसायासाठी व औषध उपचारासाठी 6 लाख 75 हजार रुपये 15 टक्के व्याजाने दिले होते. फिर्यादी महिलेने मे 2022 पर्यंत आरोपींना 9 लाख 45 हजार रुपये दिले. तसेच फिर्यादीच्या मैत्रिणीने ही आरोपींकडून 5 लाख 50 हजार रुपये कर्जाने घेतले होते. दोघींचे मिळून आरोपीने आणखी 21 लाख 39 हजार रुपये परत कऱण्याची मागणी केली. फिर्यादी यांच्याकडून आरोपीने सेक्युरेटी म्हणून जबरदस्तीने कोरे चेक, स्टॅम्प पेपर घेतले. 15 दिवसात पैसे परत केले नाही तर घराचा ताबा घेईन असा करारनामा तरयार करत त्यावर जबरदस्तीने सही घेतली. तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून खंडणी विरोधी पथकाने दोन्ही पती-पत्नीला अटक करून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढिल तपास खंडणी विरोधी पथक एक चे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *