• November 4, 2022
  • No Comment

कर्जाच्या बदल्यात सहापट रक्कम वसूल केल्यानंतर, जीवे मारण्याची धमकी देणारा खाजगी सावकार जेरबंद

कर्जाच्या बदल्यात सहापट रक्कम वसूल केल्यानंतर, जीवे मारण्याची धमकी देणारा खाजगी सावकार जेरबंद

    सिंहगडः एक लाख रुपये कर्जाच्या बदल्यात सहा लाख रुपये वसूल केल्यानंतर आणखी अडीच लाखाच्या मागणीसाठी ठार मारण्याची धमकी देणाऱ्या खाजगी सावकाराला पोलिसांनी अटक केली आहे.

    सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागराज उर्फ नागेश रत्नाकर नायकोडी (वय 24, शनी नगर जांभूळवाडी रोड पुणे) असे अटक करण्यात आलेल्या खाजगी सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी विपुल अरविंद सोलंकी (वय 35) यांनी तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादीने 2020 मध्ये आरोपीकडून 15 टक्के व्याजदराने एक लाख रुपये घेतले होते. त्याच्या बदल्यात आतापर्यंत ऑनलाईन आणि फोन पे द्वारे 5 लाख 95 हजार रुपये पाठवले. त्यानंतर ही आरोपीने फिर्यादीच्या घरात बळजबरीने घुसून अजून अडीच लाख रुपयांची मागणी केली. हे पैसे दिले नाही तर ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *