• November 4, 2022
  • No Comment

सासरच्यांकडून विवाहितेचा आर्थिक व मानसिक छळ, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

सासरच्यांकडून विवाहितेचा आर्थिक व मानसिक छळ, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    भोसरी: सासरच्यांकडून आर्थिक व मानसिक छळ प्रकरणी दापोडी येथील विवाहितेने आपल्या पती, दिर व सासू यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    सासू वय 46 वर्ष, दिर – अजिंक्य कांबळे, वय 25 वर्षे, पती – अक्षय कांबळे, वय 28 वर्षे, सर्व रा. न्यू गुलाबनगर दापोडी, पुणे यांच्या विरोधात भा. द. वि कलम 498(अ), 323, 504, 507 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    हा छळ 2016 पासून आतापर्यंत फिर्यादीच्या राहत्या घरी चालू होता. फिर्यादी यांची पती, सासू व दिर हे घरगुती कारणावरून शिवीगाळ करत असत. तसेच त्यांची सासू तुला मुलबाळ होत नाही, तु वांझोटी आहे, असे बोलून त्यांचा मानसिक छळ करून अपमानीत करत होते.

    त्यानंतर फिर्यादीला लग्नामध्ये पतीने अंदाजे एक लाख रुपयांचे केलेले सोन्याचे दागिने त्यांना न विचारता चिंचवड येथे गहाण ठेवले असून त्यातील काही दागिने विकून पैसे घेऊन परस्पर खर्च केले आहेत. फिर्यादी यांना वारंवार शिवीगाळ मारहाण करून धमकी देऊन त्यांचा शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ केला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *