- November 4, 2022
- No Comment
दुप्पट पैसे करतो असे अमिष दाखवून लाखोंना घातला गंडा
निगडी: दुप्पट पैसे करतो असे अमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजाराम कचरे, वय 48 वर्षे, रा.चिंचवड यांनी निगडी पोलिसांना फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बाबा डहाणे, वय 36 वर्षे, रा. रावेत मुळगाव. मु. पो. सारोळाबद्दी, ता. जि. अहमदनगर या आरोपी विरोधात भादवि कलम 406 व 420, महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड डिपॉझिट अॅक्ट कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी बाबा डहाणे याने त्याच्या ट्रेड विनर कन्सल्टन्सी मध्ये पैसे गुंतविल्यास चार महिन्यानंतर दुप्पट कम देण्याचे आमिष दाखविल्याने फिर्यादीने आरोपीच्या ट्रेड विनर कन्सल्टन्सी मध्ये पत्नीच्या नावे 4.75 लाख रुपये रक्कम गुंतवणूक केली होती. फिर्यादीला आरोपीने 10 सप्टेंबर 2022 रोजीचा 10 लाख रुपये रक्कमेचा चेक दिला होता. तो बँकेत डिपॉझिट केला असता बाउन्स झाला आहे.
आरोपीने फिर्यादीची दुप्पट रक्कम देण्याची आमिष दाखवून मोबदला न देता 4.75 लाख रुपयांची तसेच इतर आणखी लोकांना दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून सर्वांची फसवणूक केली आहे.या प्रकरणाचे तपास अधिकारी व्ही एस धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, निगडी पोलीस ठाणे करीत आहेत.