- November 4, 2022
- No Comment
महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच निलंबन
पुणे: पुण्यातील मंडई परिसरात 19 ऑक्टोबर रोजी एका महिलेला पोलीस कॉन्स्टेबलने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
पार्किंगच्या वादातून महिला आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे भांडण झाल्यानंतर हा सर्व प्रकार घडला होता. यातील पोलीस कर्मचाऱ्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे निलंबन ही करण्यात आले आहे. पाेलीस कर्मचारी राहूल शिंगे याच्यावर विश्रामबाग पाेलीस ठाण्यात भादंवि कलम 337,323, 504 नुसार गुन्हा दाखल करुन त्याचे निलंबन करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
याबाबत पाेलीसांकडे कांचन दिपक दाेडे (वय-50) यांनी तक्रार दाखल केली आहे.निलंबीत पाेलीस कर्मचारी राहूल शिंगे हे खडक पाेलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दाेडे यांचा बांगडी व्यवसाय असून महात्मा फुले मंडई मंडई पाेलीस चाैकीजवळ त्यांचे दुकान आहे. या दुकानात त्या 19 ऑक्टाेबर राेजी असताना, दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान राहुल शिंगे हा पाेलीस कर्मचारी त्याठिकाणी आला व त्याने दुकाना समाेरील पाण्याच्या नळाजवळ त्याची माेटारसायकल पार्क केली.
त्यामुळे दाेडे यांनी त्यास याठिकाणी दुचाकी पार्क करु नका असे सांगितले असता, त्याचा राग त्याला येऊन त्याने महिलेस शिवीगाळ करुन त्यांच्या ताेंडावर उजव्या डाेळयाजवळ हाताने ठाेसे मारुन दुखापत केली. याप्रकरणी त्या पाेलीसांकडे तक्रार देण्यासाठी गेल्या असता त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. मात्र, याबाबत भाजपचे पदाधिकारी चित्रा वाघ, प्रमाेद काेंढरे, पुष्कराज तुळजापूरकर यांनी पुढाकार घेत दाेषी पाेलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करुन त्याच्यावर कारवाईची मागणी करत पाेलीसांकडे पाठपुरावा केला. प्रसारमाध्यमांनी ही याप्रकरणास वाचा फाेडल्यानंतर त्याबाबतची दखल वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांनी घेत अखेर याबाबत संबंधित पाेलीस कर्मचारी राहुल शिंगे याच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत पुढील तपास विश्रामबाग पाेलीस करत आहे.