- November 4, 2022
- No Comment
वारजे परिसरात सापडली जिवंत काडतुसे
वारजे: पुण्यात सातत्याने दहशत निर्माण करणाऱ्या घटना समोर येत आहे. यात पुण्यातील वारजे परिसरात जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रास्त्रे आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला नालेसफाई करताना ही जिवंत काडतुसे आणि शस्त्रांनी भरलेली बॅग आढळली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागामध्ये मुकादम म्हणून शरद पाटोळे कार्यरत आहे. ते त्यांच्या सहा कर्मचाऱ्यांसह पुणे बैंगलोर हायवेजवळील पॉप्युलर नगर समोरील नाल्यातील कचरा काढत होते. यावेळी नाल्यात एका पिशवीमध्ये धारधार शस्त्रास्त्रे आणि अग्निशस्त्रांची (बंदूक) 15 जिवंत काडतूसे आढळली.
या पिशवीत 4 चॉपर, 3 मूठ, 3 गुप्ती, लोखंडी फायटर तसेच बंदुकीचे 15 जिवंत काडतूसे सापडली आहेत. ही सर्व शस्त्रे व काडतूसे ताब्यात घेण्यात आली असून अज्ञात आरोपीविरोधात कलम 3, 4 (25) भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही शस्त्रास्त्रे आणि काडतुसे कोणी टाकली, तसेच ही कशासाठी वापरण्यात येणार होती आणि आली कुठून याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.