- October 20, 2022
- No Comment
दोन ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा, आठ ग्रॅम मेफेड्रोन जप्त
पुणे: अंमली पदार्थ विरोधी पथकाने वेगवगेळ्या कारवाईमध्ये मेफेड्रोन या अंमलीपदार्थासह चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी सुमारे आठ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले आहेत.
ऋशीकेश अनिल पासलकर (वय 25 रा. बिबेवाडी) प्रणव प्रकाश ठाकुर (रा.रविवार पेठे), विशाल नंदकुमार शिंदे (वय 41 रा.खडक),जुनेद अफजल खान (वय रविवार पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक एक यांचे पथक गस्त घालत असताना कोरेगाव पार्क पोलीस ठाण्य़ाच्या हद्दीमध्ये असताना सार्वजनीक रोडवर एक जण संशयीतरित्या उभारल्याचे पोलिसांना कळाले त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ऋषीकेशला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 6 ग्रॅम 970 मिलीग्रॅम वजनाचे एमडी, मोबाईल एसा एकूण 1 लाख 4 हजार 550 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याने हे अंमली पदार्थ प्रणव ठाकुर कडून घेतल्याचे कबुल केले. पोलिसांनी ठाकुर यालाही अटक करून दोघांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईमध्ये पोलिसांनी गस्त घालत असताना रविवार पेठ येथे तांबोळी मस्जिद येथे एक जण संशयीत रित्या उभारल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी विशाल शिंदे याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 7 ग्रॅम 690 मिलीग्रॅम एमडी व मोबाईल व दुचाकी असा एकूण 2 लाख 15 हजार 350 रुपयांचा ऐवज जप्त केला.त्याने हे अंमली पदार्थ जुनेद याच्या कडून घेतल्याचे कबुल केले. त्यानुसार पोलिसांनी जुनेदलाही अटक केले. दोघांवरही फरसखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.