• October 17, 2022
  • No Comment

कराटे स्पर्धेत चॅम्पियन्स स्पोर्ट्स कराटे-डो असोसिएशनच्या खेळाडूंनी पटकवली १४ पदके.

कराटे स्पर्धेत चॅम्पियन्स स्पोर्ट्स कराटे-डो असोसिएशनच्या खेळाडूंनी पटकवली १४ पदके.

लोणी काळभोर: सिको काय कराटे इंटरनॅशनल इंडिया महाराष्ट्र यांच्या आयोजनाने ओपन ही कराटे स्पर्धा विमल गार्डन,राहतांनी पुणे येथे रविवारी (दि.१६)पार पडली. यामध्ये कवडीपाट येथील चॅम्पियन्स स्पोर्ट्स कराटे-डो असोसिएशनच्या ९ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.कुमिते व काता या प्रकारत ५ सुवर्ण ,४ रौप्य, ५ कांस्य अशा एकूण १४ पदकांची कमाई करत खेळाडूंनी भरघोस यश संपादित केले.

वयोगट व वजन गटाप्रमाणे निकाल पुढीलप्रमाणे:

१)ओजस्विनी पुराणिक – कुमिते – रौप्यपदक / काता – कांस्यपदक

२)प्रतीक्षा गुंजोटे – कुमिते – सुवर्णपदक / काता – कांस्यपदक .

३)महिमा कुमदाळे – कुमिते – रौप्यपदक

४)आराध्या बोरावणे – कुमिते – रौप्यपदक

५)आयुष्य मदने – कुमिते – सुवर्णपदक

६) प्रितम गुंजोटे – कुमिते – सुवर्णपदक / काता- सुवर्णपदक.

७) वैभव रसाळ – कुमिते – सुवर्णपदक

८) अलोक पवार – कुमिते – कांस्यपदक / काता – कांस्यपदक .

९)अभिषेक जाधव – कुमिते – रौप्यपदक / काता- कांस्यपदक.

पदकांची कमाई करत सर्व टीमने अस्मरणीय यश संपादित केले.हे सर्व खेळाडूं मुख्य कराटे प्रशिक्षक – सेन्साई हेमंत डोईफोडे सर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहेत. या सर्व खेळाडूंना पालकवर्ग विद्यार्थ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या सर्व खेळाडूचे व प्रशिक्षकांचे कौतुक सर्वच क्षेत्रातून होत आहे.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *