मोबाईल चोरणारी टोळी गजाआड,गुन्हे शाखा एक ची धडाकेबाज कामगिरी

मोबाईल चोरणारी टोळी गजाआड,गुन्हे शाखा एक ची धडाकेबाज कामगिरी

पुणे: पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी खूप नागरिक येतात. याच गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई पुणे आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने केली आहे.

आगुराम्मा गिडीआण्णा गुंजा, आमुल्ला आप्पुतोलाप्रभाकर कंप्परिलाथिप्पा, अनिता पिटला सुधाकर, सुशिला इसाक तम्पीचेट्टी सर्व राहणार आंध्रप्रदेश यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना खबर मिळाली की, दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी आंतरराज्यातील टोळी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी वेगवेगळ्या टीममध्ये विभागून कारवाई करत चौघांना रंगेहात पकडले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून 97 हजार रुपये किंमतीचे 4 मोबाईल जप्त केले. आरोपी विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई गुन्हे शाखा एकचे पोलीस निरीक्षक संदिप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक अशिष कवछेकर, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार राहूल मखरे, शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, अभिनव लडकत, शुभम देसाई, निलेश साबळे, अजय थोरात, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर, विठ्ठल साळुंखे,अनिकेत बाबर, तुषार माळवदकर, रुक्साना नदाफ यांनी केली आहे.

 

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *