• November 7, 2022
  • No Comment

गायी, म्हशीचे दुध वाढविण्यासाठी ‘ऑक्सिटॉसिन’ बेकायदा पदार्थाची निर्मिती साठा आणि विक्री वितरण करणारी टोळी जेरबंद

गायी, म्हशीचे दुध वाढविण्यासाठी ‘ऑक्सिटॉसिन’ बेकायदा पदार्थाची निर्मिती साठा आणि विक्री वितरण करणारी टोळी जेरबंद

पुणे: ऑक्सीटोसीन या औषधाची अवैद्यपणे निर्मिती, साठवणुक करुन त्याचा गैरवापर जनावरांचे दुध पाणविण्यासाठी विक्री व वितरण करणा-या परराज्यातील टोळी जेरबंद करुन ५३लाख ५२हजार ५२० रुपये किंमतीचा ऑक्सिटॉसिन साठा अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी जप्त केला आहे.

समीर अन्वर कुरेशी, (वय २९) रा. स. नं. २९, गट नं. १ ए/२/१, कलवड वस्ती लोहगांव बुध्द विहार रोड, पुणे, मुळगांव- रा.जि.मेरठ, राज्य उत्तर प्रदेश, बिश्वजीत सुधांशु जाना, (वय ४४), रा. पुरबा बार, इलासपुर, पुरबा मदीनीपुर पश्चिम बंगाल, मंगल कनललाल गिरी, (वय २७), रा. तिराईपुर विलास पुर इस्ट मदिनपुर, पश्चिम बंगाल, सत्यजीत महेशचंद्र मोन्डल, (वय २२), रा. नबासन कुस्तीया पंचायत, साऊत २४ परगना, पश्चिम बंगाल, श्रीमंता मनोरंजन हल्दर, (वय ३२) रा. नलपुरकुर, मंडाल परा गिलरचंट साऊत, २४ परगना, पश्चिम बंगाल अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ०५/११/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, स.नं.२५९, गट नं. १९/२/१ कलवड वस्ती, बौध्द विहार रोड, लोहगांव, पुणे याठिकाणीअसणारे पत्र्याचे शेड मध्ये जनावरांना दुध पाणवण्यासाठी देण्यात येणा-या कुपीचा, इंजेक्शनचा बेकायदेशीर साठा केला आहे सदर बातमीचे अनुशंगाने अन्न व औषध प्रशासन पुणे येथील अधिकारी यांना कळविले व कारवाईकरीता मिळालेल्या ठिकाणी जावुन छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी असणारे जागेत एका पत्र्याचे शेड मध्ये वेग- वेगळ्या पुढयाचे बॉक्स मध्ये वेगवेगळया प्रमाणात ऑक्सिटोसिन या द्रावणाचा साठा करुन ते विक्री करीता पॅकिंग करुन ठेवलेले दिसले.

ऑक्सिटॉसिन औषधाचे उत्पादन करुन ते औषध कुपी व इंजक्शन मध्ये भरत असताना दिसुन आले. त्याबाबत त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याचा एक साथीदार सदरचेद्रावण तयार करून देत असल्याचे व ते मुख्य आरोपी समीर कुरेशी पुणे शहर व जिल्हयातील जनावरांचे गोठयाचे मालक यांना बेकायदेशिररित्या पुरवित असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर सोबतचे अन्न व औषध प्रशासन विभागकडील अधिकारी छापा टाकुन आरोपीस ताब्यात घेतले.

सदर ठिकाणी एकुण ५३,५२,५२०/- रुकिचा ऑक्सिटॉसिन साठी लागणारा तयार माल, कच्चा माल पॅकींग मटेरीयल, आरोपी यांचे मोबाइल फोन असा साठा निळुन आल्याने जप्त करण्यात आला आहे नमुद ऑक्सिटोसिन औषध हे आरोपी समीर कुरेशी हा गाई, म्हशीचे गोठा मालक यांना विक्री केल्यानंतर ते औषध गाई म्हशी यांना त्याचे दुध पाणविण्यासाठी दिल्यानंतर गायी म्हशी पासुन मिळणारे दुध हे मानवी आरोग्यास हानीकारक होतअसून, त्याचे सेवन केल्याने आरोग्यावर विषारी परिणाम होतात, जसे श्रवण कमजोरी, दृष्टीहिनता, पोटाचे आजार, नवजात बाळाची कावीळ, गरोदर स्त्रीचा रक्तस्त्राव व अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे व त्वचेचे आजार इत्यादी गंभीर रोग होण्याची शक्यता आहे. सदरचे ऑक्सीटॉसिन हे हार्मोन असून त्याचा वापर प्रसुती सुरळीत करण्यासाठी होत असल्याचे श्री. सुहास सावंत, औषध निरीक्षक, पुणे यांनी सांगुन नमुद आरोपीविरुध्द त्यांनी विमानतळ पो स्टे येथे भादविकलम ३२८, ४२०, १७५,२७२,२७४,३४ व प्राण्यांना क्रुरतेणे वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० अंतर्गत कलम ११ (ग) व कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अनिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शननुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक,. विनायक गायकवाड, सहा.पो.निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, मनोजकुमार साळुंके, राहुल जोशी, संदिप शिर्के, सचिन माळवे, विशाल शिंदे, संदेश काकडे, योगेश मोहिते यांनी केली आहे.

Related post

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय तरूणाला १० वर्षे ‘सक्तमजुरी’

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय…

पुणे: बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व…
महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत…
थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *