• May 4, 2023
  • No Comment

जर्मनीतील कंपनीत क्रिप्टो करन्सीमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळत नसल्याने तरुणाचे अपहरण

जर्मनीतील कंपनीत क्रिप्टो करन्सीमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळत नसल्याने तरुणाचे अपहरण

    पुणे : जर्मनीतील कंपनीत क्रिप्टो करन्सीमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळत नसल्याने त्याला कारणीभूत असल्याचे समजून तरुणाचे डेक्कन जिमखाना येथील हॉटेलमधून अपहरण करून त्याला फलटण येथील हॉटेलमध्ये रात्रभर डांबून ठेवल्याचा व त्याच्या फ्लॅटचे जबरदस्तीने खरेदीखत करून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

    याप्रकरणी समीर दस्तगीर काझी (वय ४०, रा. श्रीनाथ सोसायटी, थेरगाव, चिंचवड) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अजिंक्य प्रताप कदम, वैभव भारत कदम, श्रेयस कदम, राहुल निंबाळकर, मनोज भगत, अभिमन्यू घनवट (सर्व रा. फलटण, जि. सातारा) व त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जंगली महाराज रोडवरील हॉटेल शुभम आणि फलटण येथे २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा ते २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडला.

    अधिक माहितीनुसार, फिर्यादीच्या सांगण्यावरून आरोपींनी डिजिटल टेक्नॉलॉजी प्लॅटीन वर्ल्ड (जर्मनी) या कंपनीच्या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केली. कंपनीच्या सिस्टीममध्ये अपडेट सुरू असल्यामुळे महिन्याचा परतावा क्रिप्टो कॉइन स्वरूपात अकाउंटला जमा होत होता. परंतु भारतीय चलनात पैसे काढण्यास वेळ लागत होता. या सर्वास फिर्यादी कारणीभूत आहे, अशी आरोपींची समजूत झाली. फिर्यादी हे हॉटेल शुभम येथे बसले असताना आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादीस चाकू लावून मारहाण केली. त्यांना ठार मारण्याची तसेच गावाकडील घर जाळण्याची धमकी दिली. जर्मनीतील कंपनीत गुंतविलेल्या ६५ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला जबरदस्तीने फाॅर्च्युनर गाडीत बसविले. गाडी कोठे गेली हे समजू नये, यासाठी गाडीचे स्मार्ट कार्ड काढून ठेवले.

    फिर्यादीला फलटणच्या महाराजा हॉटेल येथे नेऊन रात्रभर डांबून ठेवले. त्यानंतर फलटणला शेतातील अनोळखी फार्महाऊसवर नेले. तेथे फिर्यादी यांना चाकू लावून सांगेल तसे करण्यासाठी दबाव टाकला. दुसऱ्या दिवशी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नेऊन फिर्यादीच्या फलटण लक्ष्मीनगरमधील फ्लॅटचे मनोज भगत याच्या नावावर जबरदस्तीने खरेदीखत करून घेतले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीला सायंकाळी सोडून दिले. त्यानंतर पुण्यात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक पठाण तपास करीत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *