गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद, पुणे शहर पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी
- क्राईम
- September 8, 2022
- No Comment
पुणे: पुण्यातील गणेशोत्सवात गर्दीचा गैरफायदा घेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंध्र प्रदेशातील टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कारवाई पुणे आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने केली.
मिनावत रविचंद्र माईक (वय 31), फिलीप नागराज समुद्रला (वय 32), गुंजा व्यंकटेशरलु गिड्डीना (वय 36), विसादु चिंन्नाबाणू नायक (वय 29) सर्व राहणार आंध्रप्रदेश अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात गस्त घालत असताना ओंकारेश्वर मंदिराच्या मागील भिंतीलगत शनिवार पेठ येथे ही टोळी जमा होणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. आरोपी तेथे येताच त्यांच्या हालचाली बघून पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांना त्यांच्याजवळ आठ मोबाईल, दोन सत्तूर, एक सेल्फ डिफेन्स स्प्रे, नायलॉनची दोरी असा एकूण 1 लाख 16 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
सदर गुन्ह्यादरम्यान आरोपी विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.