- October 22, 2022
- No Comment
प्रसिद्ध महाविद्यालयात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
लोणी काळभोर: पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील एमआयटी महाविद्यालयाच्या आवारात एका 21 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
जॉर्डन पब्लिसीयेस असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. एमआयटी महाविद्यालयातील डिझाईन विभागात तो चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांना जॉर्डनने वस्तीगृहात गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलिसांना याची माहिती दिली.
दरम्यान जॉर्डन यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. जॉर्डन हा मूळचा बंगळुरू येथील रहिवासी होता. त्याचे आई-वडील विमानाने पुण्याला येण्यासाठी निघाले आहे. दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.