- January 1, 2023
- No Comment
लोहमार्ग पोलीस शिपाई भरतीची शारीरिक व मैदानी चाचणी सुरु, पहा सविस्तर
लोहमार्ग पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून येत्या गुरुवार म्हणजे 5 जानेवारी 2023 पासून उमदेवरांच्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचाणीला सुरुवात होणार आहे,अशी माहिती लोहमार्ग पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी शुक्रवारी (दि.30) प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे .
त्यांनी दिलेल्या पत्रकात सांगितले आहे की, लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2021-2022 च्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून 5 जानेवारी ते 18 जानेवारी 2023 या 13 दिवसांच्या कालावधीत ती पार पडणार आहे. पुण्यातील खडकी येथील अम्युनेशन फॅक्ट्री (गोला बारुद निर्माण) ऑर्डीन्स इस्टेट क्रिकेट ग्राऊंड एम्प्लॉईज हॉस्टेल समोर च्या ग्राऊंडवर पहाटे साडे पास पासून सुरु होणार आहेत.
याबाबत अधिक सुचना व माहिती उमेदवारांना www.policerecruitment2022.mahait.org तसेच [email protected] या संकेतस्थळावर मिळणार आहे., असेही धिवरे यांनी पत्रकात म्हटले आहे.
लोहमार्ग पोलीस शिपाई भरती साठी 15 डिसेंबर पर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले होते. प्राप्त अर्जानंतर पुढील भरती प्रक्रीयेला 5 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे, तरी उमेदवारांनी सुचनानुसार वेळेत हजर रहावे असे आवाहन लोहमार्ग पोलीसातर्फे करण्यात आले आहे.