• December 31, 2022
  • No Comment

पुर्ववैमनस्यातून गर्दीमध्ये गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकची कामगिरी

पुर्ववैमनस्यातून गर्दीमध्ये गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकची कामगिरी

     

    पुणे: खुनाचा बदला घेण्यासाठी पुण्यातील रामेश्वर चौकात गर्दीमध्ये गोळीबार करत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने पिस्टलसह अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.30) कोंढवा परिसरात केली.

    प्रथमेश उर्फ गणेश गोपाळ यमुल (वय 22 रा.नाना पेठ पुणे) व त्याचा साथीदार रुपेश राजेंद्र जाधव (वय 24 रा.कुंभारवाडा, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्चस्ववादातून 26 जुलै 2022 रोजी रात्री नाना पेठ येथे अक्षय वल्लाळ याचा किशोर शिंदे व महेश बुरा यांनी घरात घुसून चाकुने वार करत खून केला होता. याच खूनाचा बदला म्हणून 27 डिसेंबर रोजी वल्लाळ याचा मावस भाऊ कृष्ण गाजुल व त्याच्या साथीदारांनी किशोरचा भाऊ शेखर शिंदे याच्यावर रामेश्वर चौकात सायंकाळी गर्दीच्या वेळी गोळीबार करत खून करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या प्रकरणीतील काही आरोपींना अटक केली होती, मात्र अन्य आरोपी व गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करण्याचा पोलीस प्रयत्न करत होता.

    यावेळी गुन्हे शाखा एकचे पोलीस अमंलदार अमोल पवार व अजय थोरात यांना बातमीदारामार्फत खबर मिळाली की, गुन्ह्यातील मुख्य आरोपी रुपेश जाधव व गणेश यमुल हे कोंढवा येथे लपून बसले आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला असता आरोपी हे दुचाकीवरून शत्रुंजय रोडवरून येताना दिसले,पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता आरोपी न थांबता तसेच पुढे गेलो. पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले.

    यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली 70 हजार रुपायांची दुचाकी, व देशी बनावटीची 40 हजार रुपायांची पिस्टल असा एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी अक्षयच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शेखर शिंदे याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यातील आरोपींवर फरसखाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला.

    सदरची कारवाई गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस अमंलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान खान, आय्याज दड्डीकर, दत्ता सोनावणे, विठ्ठल साळुंखे, महेश बांमगुडे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत, शुभम देसाई, तुषार माळवदकर यांनी केली.

    Related post

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर गुंजाळ यास जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून अटकपूर्व जामीन मंजूर

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर…

    पुणे :- येरवडा परिसरात दहशत माजवुन रात्रीच्या वेळेस बर्थ-डे केक भर चौकात सिंघम गाण्यावर कापला. सदररील बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोलीसांची कारवाई…
    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *