• November 23, 2022
  • No Comment

किरकोळ वादातून व्यापाऱ्यास मारहाण, तीन टाळकी गजाआड

किरकोळ वादातून व्यापाऱ्यास मारहाण, तीन टाळकी गजाआड

     

    पिंपरी: गाडीचा कट लागल्याने त्याचा जाब विचारला असता सात जणांनी मिळून एका व्यापाऱ्याला मारहाण करून त्यांच्या वाहनाचे नुकसान केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना जमतानी कॉर्नर, पिंपरी येथे घडली.

    प्रतीक जेम (वय 19), निखिल कांबळे (वय 18), ओंकार खैरमोडे (वय 23) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह आदित्य उमाप, स्वप्नील चंदनशिवे, आदित्य जाधव आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नितीन गुरुमुखदास नागदेव (वय 31, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास जमतानी कॉर्नर पिंपरी येथून जात असताना आरोपींनी फिर्यादींच्या गाडीला कट मारला. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींनी गाडी नीट चालवता येत नाही का, असे म्हटले. या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. त्यांनतर फिर्यादींच्या गाडीची तोडफोड करून नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *