• November 23, 2022
  • No Comment

क्रिकेट सट्टेबाजीसाठी दिलेले पैसे परत न केल्याने तरुणाची हत्या; दोन आरोपी अटक

क्रिकेट सट्टेबाजीसाठी दिलेले पैसे परत न केल्याने तरुणाची हत्या; दोन आरोपी अटक

     

    पुणे: क्रिकेट सट्टेबाजीसाठी दिलेले पैसे परत न केल्याने दोन गुंडांनी 32 वर्षीय तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना आंबेगाव येथे घडली.

    या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी विशाल आमराळे (वय 35) आणि लहू माने (वय 40) या दोन बुकींना अटक केली आहे. तर, निखिल उर्फ ​​संकेत चंद्रशेखर अनभुले (वय 32, आंबेगाव बुद्रुक) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हर्षदा निखिल अनभुले (वय 24, आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना 15 नोव्हेंबर रोजी रात्री ते 16 नोव्हेंबरच्या सकाळी फ्लाइंग बर्ड स्कूल आंबेगाव ते बिबवेवाडीच्या बाजारपेठ दरम्यान घडली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल अनभुले याने विशाल अमराळे याच्याकडून 28 हजार रुपये घेतले होते. ते परत करण्यासाठी अमराळे त्याला वारंवार फोन करून आपली गुन्हेगारी प्रतिमा सांगून धमक्या देत ​​होता. असे असतानाही निखिलने पैसे परत केले नाहीत. त्यामुळे 15 नोव्हेंबर रोजी निखिलला आंबेगाव येथील फ्लाइंग बर्ड स्कूलमध्ये बोलावण्यात आले. येथे अमराळे व त्याच्या साथीदारांनी त्याचे अपहरण करून केके मार्केटमध्ये आणून त्याला डांबून ठेवले.

    निखिलची पत्नी हर्षदा हिने दिलेल्या तक्रारीनुसार, 16 नोव्हेंबरच्या पहाटे हर्षदाला निखिलचा फोन आला. ज्यामध्ये त्याने सांगितले, की काही लोकांनी त्याचे अपहरण केले आहे आणि त्याला कोंडून ठेवले आहे. जोपर्यंत तो त्यांच्याकडून घेतलेली रक्कम देत नाही, तोपर्यंत ते त्याला सोडणार नाहीत. निखिलच्या मित्राने हर्षदाला सांगितले की, तिच्या पतीला 15 नोव्हेंबरच्या रात्री आंबेगाव परिसरातून काही व्यक्तींनी कारमधून पळवून नेले. काही वेळाने कुटुंबातील सदस्यांनी ऑनलाइन बँकिंग ऍप्लिकेशनद्वारे निखिलच्या खात्यात 28000 रुपये ट्रान्सफर केले. काही वेळाने निखिल घरी परतला आणि अचानक जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. निखिलच्या पाठीवर आणि छातीवर जोरदार वार करून त्याला जखमी करण्यात आले होते. आणि यामुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. या अहवालानुसार, पोलिसांनी निखिलवर प्राणघातक हल्ला झाल्याचे म्हंटले आहे.

    पोलिसांनी विशाल आमराळे आणि लहू माने याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *