• November 23, 2022
  • No Comment

वेश्या व्यवसाय प्रकरणी दोन आरोपी गजाआड, तीन महिलांची सुटका

वेश्या व्यवसाय प्रकरणी दोन आरोपी गजाआड, तीन महिलांची सुटका

     

    हिंजवडी: ऑनलाईन ग्राहकांचा शोध घेऊन त्यांना लॉजवर मुली पुरवणाऱ्या दोन दलालांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने अटक केली. यामध्ये तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

    रॉकी उर्फ ऋषिकेश शिरीष कदम (वय 30 , रा. मॉडेल कॉलनी, पुणे) आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. या दाम्पत्यावर मागील काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल आहे. एकदा कारवाई होऊन देखील हे दाम्पत्य सुधारले नाही.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात ऑनलाईन माध्यमातून वेश्या व्यवसाय चालवणारे दोघेजण सक्रिय असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा लावून पोलिसांनी एका हॉटेलमध्ये रूम बुक केली. तिथे आरोपी महिला तीन महिलांना घेऊन आली असता तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. महाराष्ट्रीयन तीन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. आरोपींकडून 16 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *