• November 23, 2022
  • No Comment

कोयत्याने आणि दगड विटांनी मारहाण करून सराईताचा खून, सहा टाळकी गजाआड

कोयत्याने आणि दगड विटांनी मारहाण करून सराईताचा खून, सहा टाळकी गजाआड

     

    पुणे: पुण्यातील नानापेठेत मंगळवारी मध्यरात्री एका सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आलाय. एका महिलेसह सहा जणांनी मिळून मध्यरात्री त्याच्यावर खुनी हल्ला चढवला.

    या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. नाना पेठेतील राजेवाडी परिसरात मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रोहन रवींद्र पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहन पवार हा सर्व गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी रोहन पवार यांच्या घराजवळ राहणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत उर्फ मट्या कुचेकर, तेजस जावळे, राजन उर्फ रोहित काउंटर, अतिश उर्फ प्रकाश फाळके, आदित्य केंजळे आणि उषा कुचेकर अशी आरोपींची नावे आहेत. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत यांच्यात पूर्वीपासूनच वाद होते. याच वादातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारी मध्यरात्री रोहन हा घरात असताना आरोपी मट्या यांनी त्याला घराबाहेर बोलावले आणि कोयत्याने वार केले. इतर आरोपींनीही त्याच्यावर चाकूने आणि दगड विटांनी वार करत तिला ठार मारले. या भीषण हल्ल्यात रोहन पवार याचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *