- November 23, 2022
- No Comment
पिंपरी-चिंचवड: अनधिकृत बांधकामावर कारवाई
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत वाल्हेकरवाडी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. यावेळी सुमारे 432 चौरस मीटर अनाधिकृत बांधकामे महापालिकेच्या वतीने निष्कासित करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख यांच्या नियंत्रणाखाली बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ही कारवाई केली. या कारवाईमध्ये 5 आरसीसी व 1 वीट बांधकाम पत्रा असे एकूण सुमारे 432.00 चौरस मीटर (4649.00 चौरस फुट) अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली.

सदरची कारवाई उपअभियंता मनोज बोरसे, ‘ब’ प्रभागातील धडक कारवाई पथकातील कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अतिक्रमण विभागातील कर्मचारी, महापालिकेचे पोलिस कर्मचारी यांच्यासह महाराष्ट्र पोलिस सुरक्षा बल तसेच 5 मजुर यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती ‘ब’ क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख यांनी दिली.
