• November 23, 2022
  • No Comment

अल्पवयीन मुलीचा विनयभंगा प्रकारणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा विनयभंगा प्रकारणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

     

    भोसरी: तिघांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्याचा जाब विचारण्यासाठी मुलीचे वडील गेले असता तिघांनी मुलीच्या वडिलांना मारहाण केली. ही घटना गव्हाणे वस्ती भोसरी येथे घडली.

    आदेश वाघमारे (वय 18, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) आणि त्याचे दोन अल्पवयीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या गल्लीतील मुले फिर्यादींच्या मुलीला वारंवार त्रास देत असत. एकाने फिर्यादींच्या मुलीशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. इतर दोघांनी तिला जाता येता पाहून अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार फिर्यादींना समजला असता त्यांचे पती आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *