• December 12, 2022
  • No Comment

दहशत माजविणाऱ्या गुंडाविरोधात एमपीडीएनुसार मोठी कारवाई

     

    कसबा पेठ: कसबा पेठ तसेच मध्यवस्थीत दहशत माजविणाऱ्या गुंडाविरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले.

    वर्षभरासाठी त्याला कोल्हापुरातील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

    पुणे : कसबा पेठ तसेच मध्यवस्थीत दहशत माजविणाऱ्या गुंडाविरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. वर्षभरासाठी त्याला कोल्हापुरातील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल ८९ गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

    संकेत उर्फ भूषण आनंद तारु (वय २२, रा. भोईराज भवनजवळ, १११७ कसबा पेठ) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे.

    तारु याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, पिस्तुल बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी तयार केला होता. या प्रस्तावास पोलीस आयुक्त गुप्ता यांनी मंजुरी देऊन त्याला वर्षभरासाठी कोल्हापुरातील कारागृहात स्थानबद्ध केले. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल ८९ गुंडाविरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *