- November 20, 2022
- No Comment
तरुणीवर गरोदर राहिल्यानंतर लग्न करण्यास दिला नकार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
म्हाळुंगे: फिरायला जाण्याच्या बहाण्याने तरुणीला बोलावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिने लग्नाबाबत विचारले असता तरुणाने लग्न करण्यास नकार दिला.
पीडित 20 वर्षीय तरुणीने सात महिन्यानंतर महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोमल कांत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात आरोपीने फिर्यादीला फोन करून फिरायला जाण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर मोकळ्या शेतात घेऊन जात त्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. यामध्ये तरुणी गरोदर राहिली. तरुणीने आरोपीकडे लग्नाची मागणी केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.