- November 15, 2022
- No Comment
अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणारा टोळका गजाआड

हिंजवडी: घरी अभ्यास करत असलेल्या अल्पवयीन मुलीला हाक मारून बाहेर बोलावून घेत तिच्याशी गैरवर्तन केले. याप्रकरणी 32 वर्षीय आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सुसगाव येथे घडली.
सचिन लक्ष्मण जाधव (वय 32, रा. सुसगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि. 15) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी तिच्या घरी अभ्यास करत बसली होती. त्यावेळी आरोपीने हाक मारून तिला बोलावून घेतले. हाक मारली असल्याने मुलगी आरोपीजवळ गेली असता त्याने मुलीसोबत गैरवर्तन केले. मुलीला लग्नाची मागणी घालत तिने लग्न केले नाही तर जीवे मारण्याची त्याने धमकी दिली.
मागील काही दिवसांपासून आरोपी पीडित मुलीचा पाठलाग करत होता. रस्त्याने जाताना, खरेदी करताना तिचा पाठलाग करून तिचे व्हिडीओ बनवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.