- November 15, 2022
- No Comment
पोलीस स्टेशनच्या जवळ कोयते घेऊन दोन गटात हाणामारी
बुधवार पेठे: पुण्यातील बुधवार पेठेत क्रांती चौक येथे कोयते घेऊन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून हा सारा प्रकार पोलीस स्टेशनच्या जवळ घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बुधवार पेठेतील क्रांती चौकात वर्दळ असताना हा सारा प्रकार घडला. सीसीटीव्हीमध्ये काही आरोपी कोयत्याने वार करताना दिसत आहेत. गर्दी असताना हा प्रकार घडला.