- November 15, 2022
- No Comment
गोडाऊनमध्ये सुरक्षा रक्षकाचा खून,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
हडपसर: पुण्यातील हडपसर परिसरात एका गोडाऊनमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. गोडाऊन मध्येच अडगळीच्या खोलीत त्या व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे.
हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
काशिनाथ कृष्णा महाजन (वय 55, रा. मूळ जळगाव) असे खून झालेल्या सूरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी शंकर मुरलीधर बनकर (वय 42) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी परिसरात मोनार्रच कंपनीचा गोडाऊन आहे. या गोडाऊन मध्ये काशिनाथ महाजन हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते.आज सकाळच्या सुमारास त्यांचा या परिसरात मृतदेह आढळला. अज्ञात व्यक्तीने त्यांचे हात पाय आणि तोंड बांधून खून केला आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.