- November 16, 2022
- No Comment
पिस्टल व जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद, सिंहगड रोड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
सिंहगड: सिंहगड रोड पोलिसांनी संशयीतरित्या फिरणाऱ्या तरुणाला पिस्टल व जिवंत काडतुसासह अटक केली आहे.
केशव अशोक राठोड (वय 24 रा. वडगाव बुद्रुक, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार राणा रसाळ व देवा चव्हाण यांना बातमीदारानुसार खबर मिळाली की डीपी रोडला एक जण संशयीत रित्या फिरत असून त्याने लाल चॉकलेटी रंगाचा शर्ट व जीन्स घातली असून त्याची दाढी वाढलेली आहे.
या बातमीनुसार पोलीस परिसरात गेले असता आरोपीने पळून जाण्याच प्रय़त्न केला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडून 1 पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 50 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याचा पुढील तपास सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी हे करत आहेत.