- November 16, 2022
- No Comment
महिलेचा विनयभंग करणारे दोन टोळके गजाआड
बावधानः भावाला शिवीगाळ, धमकी देत असताना भांडण सोडविण्यासाठी महिला मध्ये गेली असता दोघांनी महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार बावधन खुर्द येथे घडला.
याप्रकरणी पीडित 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन गणेश पाटील (वय 28) , गणेश बनसोडे (वय 23, दोघे रा. बावधन, ता. मुळशी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचा आरोपी सचिन पाटील हा फिर्यादींच्या भावाच्या घरी आला. त्याने फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ करून धमकी दिली. हा प्रकार सुरु असताना भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी सोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. या झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून नुकसान झाले.
हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.