- November 16, 2022
- No Comment
कीरकोळ कारणावरुन विवाहितेचा छळ, सात जणांवर गुन्हा दाखल
रहाटणी: घरातील लहान कारणांवरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पतीसह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गोडांबे कॉर्नर , रहाटणी येथे घडला.
याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती नीरज सुहासराव नाईकवाडे (वय 31), दीर सागर सुहासराव नाईकवाडे (वय 34), सासरे सुहासराव शंकरराव नाईकवाडे (वय 62), सासू, जाऊ आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील लहान कारणांवरून आरोपींनी विवाहितेला त्रास दिला. विवाहितेच्या भाऊ आणि आई यांनी हुंड्यांची मागणी केली. फ्लॅट घेण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याने विवाहितेला त्रास दिला. विवाहितेने पतीकडे 79.22 ग्रॅम वजनाचे तीन लाख आठ हजार रुपये किमतीचे दागिने आरोपींनी स्वतःकडे ठेवून घेतले. विवाहितेने दागिन्यांची मागणी केली असता आरोपींनी दागिने चोरीला गेल्याचे सांगितले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वाकड पोलीस तपास करीत आहेत.