- November 16, 2022
- No Comment
मॅक्स इन्शुरन्स कंपनीतील एजंटकडून अडीच लाखांची फसवणूक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
हिंजवडी: मुलीची पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने इन्शुरंस कंपनीच्या एजंटने एका व्यक्तीकडून दोन लाख 40 हजार रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार अॅक्सीस बँक हिंजवडी येथे घडला.
सयाजी रावसाहेब ओलेकर (वय 42, रा. हिंजवडी. मूळ रा. सांगली) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन काशिनाथ डिसले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅक्स इन्शुरन्स कंपनीत एजंट म्हणून काम करणाऱ्या सचिन डिसले याने फिर्यादी यांच्या मुलीचा विमा काढून देतो असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख 40 हजार रुपये घेतले. घेतलेल्या पैशांची रिसिप्ट न देता तसेच पैसे इन्शुरन्स साठी न भरता ओलेकर यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.