• November 16, 2022
  • No Comment

शहरातील अनाधिकृत होर्डींग्ज जाहिरात फलकासह काढणार

शहरातील अनाधिकृत होर्डींग्ज जाहिरात फलकासह काढणार

     

    पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अनाधिकृत होर्डींग्ज जाहिरात फलकासह काढण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.

    या संस्था होर्डींगचे साहित्य भंगारात विक्री करणार असून त्यातील 99 टक्के हिस्सा पालिकेला देणार आहेत. तीन वर्षासाठी हे काम दिले आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या आकाराचे अनधिकृत जाहिरात होर्डींग्ज फलक स्ट्रक्चरसह स्व:खर्चाने काढून टाकणे, निघालेल्या स्क्रॅपचे एकूण वजनानुसार मंजूर दराने येणा-या किंमतीमधून किती रक्कम पालिकेला देणार याकरिता एजन्सी नेमण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यासाठी 4 निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी अरबाज इंजिनिअरिंग अँन्ड सिव्हील कन्स्ट्रक्शन यांनी निविदा अंदाजपत्रकीय दरावर 99 टक्केवारी दर दिला आहे.

    उर्वरित 3 निविदाधारकांपैकी गणेश एंटरप्रायजेस यांनीही तेवढ्याच दरानुसार काम करण्याची तयारी दर्शविली आहे. तर, इतर दोन निविदाधारकांनी काम करण्यास नकार दिला. हे दोन्ही निविदाधारक काम पूर्ण करण्यास सक्षम आहेत. त्यांचे दर स्वीकृत करण्यास आणि करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. कामाचा कालावधी 1 वर्षाचा असणार आहे.
    याबाबत आकाशचिन्ह परवाना विभागाचे उपायुक्त सचिन ढोले म्हणाले, महापालिकेने शहरातील अनाधिकृत होर्डींग्ज काढण्यासाठी अरबाज इंजिनिअरिंग अँन्ड सिव्हील कन्स्ट्रक्शन आणि गणेश एंटरप्रायजेस यांची नेमणूक केली. होर्डींग काढणारी यंत्रणा त्यांचीच राहणार आहे. डिजीटल बोर्ड काढले जाणार आहेत. पालिकेने सांगितलेले

    डिजीटल बोर्ड काढले जाणार आहेत. पालिकेने सांगितलेले अनाधिकृत होर्डींग काढणे, ते भंगारात विक्री करुन त्यापैकी 99 टक्के रक्कम या संस्था महापालिकेला देणार आहेत. पुढील तीन वर्षात शहरात जेवढे अनाधिकृत होर्डींगज उभे राहतील. ते या संस्थांनी काढून भंगारमध्ये विक्री करायचे आणि त्यातून मिळणार रक्कमेपैकी 99 टक्के रक्कम महापालिकेला द्यायची आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *