- November 15, 2022
- No Comment
विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
थेरगाव: विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना थेरगाव परिसरात घडली.
विकास विलास माळवे (वय 27, रा.थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विलास यांच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 33 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे लग्न झालेले आहे. तिला दोन मुली होत्या. त्यातील एका मुलीचे आजाराने निधन झाले. दरम्यान तिची आणि विकास यांची एका महिलेच्या माध्यमातून जवळीक झाली. विकासला आरोपी महिलेबाबत सहानुभूती वाटत असल्याने त्यांची जवळीक प्रेमात बदलली. त्यानंतर महिलेने विकासकडे वारंवार पैशांची मागणी केली. विकासला लग्न न करण्याची तसेच लग्न केल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून विकासने शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास थेरगाव येथील एका शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
वाकड पोलीस तपास करीत आहेत.