- October 30, 2022
- No Comment
अकरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी जेरबंद
पुणे: पुण्यातील दत्तवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घराशेजारी राहणाऱ्या एका अकरा वर्षीय मुलीवर 24 वर्षीय तरुणाने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत.
पीडित मुलीच्या काकाने दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश उर्फ नन्या सुनील चिखलकर (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच इमारतीत राहतात. फिर्यादी यांची अकरा वर्षीय अल्पवयीन पुतणी हिला आरोपीने वारंवार लज्जा उत्पन्न होईल, अशा रीतीने स्पर्श केला. इतकेच नाहीतर फिर्यादीच्या राहत्या घरी तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले आहे. दरम्यान पीडित मुलीने या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.