• January 26, 2023
  • No Comment

शिक्षणाचं माहेरघर आणि शांतताप्रिय अशी पुण्याची ओळख आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पुण्यात वाढत असलेल्या गुन्ह्यांच्या घटना पाहता ही ओळख आता कायम राहिलेली नाही

शिक्षणाचं माहेरघर आणि शांतताप्रिय अशी पुण्याची ओळख आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पुण्यात वाढत असलेल्या गुन्ह्यांच्या घटना पाहता ही ओळख आता कायम राहिलेली नाही

    शिक्षणाचं माहेरघर आणि शांतताप्रिय अशी पुण्याची ओळख आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पुण्यात वाढत असलेल्या गुन्ह्यांच्या घटना पाहता ही ओळख आता कायम राहिलेली नाही. मागील काही वर्षांपासून पुण्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यात सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. सायबर क्राईम आणि विनयभंगाच्य गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे पोलीस मागील काही दिवसांपासून कोम्बिंग ऑपरेशन राबवत आहेत. यात आतापर्यंत हजारो गुन्हेगारांचा शोध घेतला आहे. मात्र याच गुन्हेगारीला वचक बसण्यासाठी पुणे पोलिसांनी 21 हजार गुन्हेगारांची यादी तयार केली आहे.

    बेसिक पोलिसिंगच्या प्रयोगातून गुन्हेगारीला वचक बसवण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर कारवाईदेखील होणार आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी गुन्हेगारी विरोधात चांगलीच कंबर कसल्याचं चित्र आहे. पुण्यातील गुन्ह्यांची चर्चा यंदाच्या अधिवेशनात झाली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्याच्या गुन्हेगारीवर अधिवेशनात चर्चा केली होती. त्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचं चित्र आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *