• January 26, 2023
  • No Comment

पुण्यातील उरुळी कांचन येथे: इन्स्टाग्रामवर पुष्पा सिनेमा स्टाईल स्टेटस ठेवल्यावरून विद्यार्थ्यांच्या गटात तुंबळ हाणामारी

पुण्यातील उरुळी कांचन येथे: इन्स्टाग्रामवर पुष्पा सिनेमा स्टाईल स्टेटस ठेवल्यावरून विद्यार्थ्यांच्या गटात तुंबळ हाणामारी

     

    एक वर्षापूर्वी झालेल्या प्रेम प्रकरणावरून अल्पवयीन मुलांमध्ये झाला वाद होता. त्यातून दोन गटात वादावादी झाली. वादाचं रुपांतर तुंबळ हाणामारीत झालं. दोन गटात झालेल्या हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात काल परस्परविरोधी गुन्हे दाखल असून 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनीभाई देसाई महाविद्यालयाच्या परिसरात इन्स्टाग्रामवर स्टेटस वरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ मारामारी झाली.

    प्रेम दत्तात्रय कांचन, रुषिकेश चांदगुडे, प्रथमेश दत्तात्रय कांचन, जयेश सुदाम कांचन, चैतन्य अप्पासो महाडीक आणि तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील एक अल्पवयीन मुलगा आणि त्याचे मित्र हे उरुळी कांचन पद्मश्री मनिभाई देसाई ज्युनिअर कॉलेज येथे मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी तिथे दुसऱ्या गटातील काही विद्यार्थी आले आणि त्यांनी त्याला इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर पुष्पा सिनेमा स्टाईलसारख्या ठेवलेल्या स्टेटस बाबत त्याला जाब विचारला. त्याचे कारण सांगण्यास त्याने नकार दिला असता आरोपींनी त्याला आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ करुन मारहाण केली. यातील एका जणांनी हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना मारहाण करुन जबर जखमी केले. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *