• January 26, 2023
  • No Comment

पुण्यात कोयता गँगची आणखीन एक धिंड पुणे पोलीसांची आणखी एक कारवाई

पुण्यात कोयता गँगची आणखीन एक धिंड  पुणे पोलीसांची आणखी एक कारवाई

    पुण्यात सध्या कोयता गॅंगचा एकप्रकारे ट्रेंडचं सुरू आहे. गुंड हातात कोयता घेऊन धुडगूस घालतात, नंतर पोलीस त्या कोयता गॅंगच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करतात. जिथं धुडगूस घातला त्या परिसरात नेऊन धिंडही काढतात. त्यामुळे पुणे पोलिसांचा हा पॅटर्न राज्यभर चर्चेत आहे. आता पुणे पोलीसांनी आणखी एक कारवाई केली आहे. पुण्यात कोयता गँगची आणखीन एक धिंड काढल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील भैरवनाथ मंदिराजवळ काही गुंडांनी धुडगूस घातला होता. यामध्ये भाजी मंडई येथे कोयते हातात घेऊन दहशत निर्माण केली होती. हे गुंड इथवरचं थांबले नाही त्यांनी एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वारही केले होते.

    त्याच सराईत गुंडांना पुणे पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सराईत तीन गुंडांना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर धायरी फाटा ते धायरी गाव दरम्यान कोयता गँगची धिंड काढण्यात आली आहे.
    कोयता हातात घेऊन दहशत माजविणारे गुंड मनोज कटीमनी, रोहित राठोड आणि रोशन आढाव यांच्या पुणे पोलीसांनी कारवाई केली आहे.

    त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या गुंडाना पोलिसी खाक्या दाखविला आहे, त्यामध्ये गुंडांची धिंड काढण्यात आली आहे.

    ज्या ज्या परिसरात या गुंडांनी धुडगूस घातला, त्याच परिसरात धिंड काढणे आणि चोप देण्याची मोहीमच पुणे पोलीसांनी हाती घेतली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *