- January 18, 2023
- No Comment
सुडबुद्धीने खुनाच्या तयारीत असलेले कथित कोयता गँगला घातक हत्यारासह केले जेरबंद
कोयता गँगचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीसांनी ठोस पाऊल उचलणेबाबत मा पोलीस
आयुक्त श्री रितेश कुमार व पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक साो, यांनी वेळोवेळी आदेश केले आहेत.
त्या अनुषंगाने युनिट- १ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार युनिट-१ चे
कार्यालयात हजर असताना पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी
मिळाली की, इसम नामे खालीद सय्यद रा कोंढवा पुणे याचे काही महिन्यांपूर्वी त्याचे ओळखीचा मुलगा नामे
सलमान रा मोमीनपुरा याचे बरोबर भांडणे झाली होती. तेव्हा सलमान याने खालीद यास तुला खलास करून
टाकीन अशी धमकी दिली होती. त्याचा बदला घेण्यासाठी खालीद सय्यद व त्याचे साथीदार त्या दिवसापासून
आपले जवळ घातक शस्त्र बाळगली असून ते सर्वजन सलमान याचा खुन करण्याचे तयारीत असून ते दुपारचे वेळी त्यांचे साथीदाराचे रहाते घरी गोयलगार्डन पाठीमागे, पत्र्याचे शेडमध्ये, कोंढवा
पुणे येथे एकत्रीत जमणार आहेत. अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाली. त्यानुसार वरिष्ठांचे आदेशाने युनिट-१ चे
पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गोयलगार्डन पाठीमागे, पत्र्याचे शेडमध्ये, कोंढवा पुणे येथे छापा टाकून
इसम नामे १) समीर सलीम शेख वय १९ वर्ष रा गल्ली नं. २ मक्का मशीद जवळ, कोंढवा पुणे..क्र.२) शाहीद
फरीद शेख वय २६ वर्ष रा स नं २६१. गोयलगार्डन पाठीमागे, कोंढवा, पुणे व त्यांचे तिन अल्पवयीन
साथीदारांसह ताब्यात घेवून त्यांचेकडून २३००/- रू किंमतीची हत्यारे त्यामध्ये एक कु-हाड, कोयता, दोन गुप्त्या
व एक तलवार अशी घातक शस्त्रे जप्त करून ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेले आरोपी व विधीसंघर्षित बालक यांचेकडे विश्वासात घेवुन तपास करता त्यांचे सांगणे
की, सुमारे ४ महिन्यापूर्वी विधीसंघर्षित बालक याची आझम कॅम्पसमध्ये नानापेठ येथील मुलांबरोबर भांडणे झाली
होती. त्यावेळेस विधीसंघर्षित बालक याचेवर लष्कर पोलीस ठाणे पुणे येथे भादवि कलम ३२६ प्रमाणे गुन्हा
दाखल झाला होता त्यावेळी सलमान महम्मद खान वय २३ रा. १०२२ रविवार पेठ पुणे याने विधीसंघर्षित
बालक व नानापेठ येथील फिर्यादी मुले यांच्यात समझोता करून आणला होता त्यानंतर परत दोन महिन्यापूर्वी
विधीसंघर्षित बालक व कासेवाडी येथील कॉलेज मधील मुले यांच्यात भांडणे झाली होती त्यावेळी विधीसंघर्षित
बालक याने मी सलमान याचा नातेवाईक आहे असे त्यांना सागितले होते. त्यावेळी सदर मुले सलमान यास तुझ्या
नातेवाईकाने आमचेशी भांडणे केली आहे. तु त्याला समजावुन सांग असे सांगितले त्यामुळे सलमान खान यास
राग आल्याने त्याने विधीसंघर्षित बालक यास चारचौघात ढकलाढकली करुन शिवीगाळ केली व माझे नाव यापुढे
घेत जावु नकोस असा दम दिला. सदर विधीसंघर्षित बालकास त्याचा राग आल्याने त्याने वरील सर्व मित्रांना
जमवुन त्याचा काटा काढण्यासाठी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी रात्रीचे वेळेस इराणी कॅफे एसजीएस मॉल येथे
बोलावुन तेथे गेम करणार होते त्याप्रमाणे सलमान महम्मद खान व त्याचा मित्र सदर ठिकाणी आल्याने
त्यांचेमध्ये बाचाबाची चालु असताना तेथे मार्शल पोलीस आल्याने त्यांचा प्लॅन फिसकटला व ते तेथुन निघुन गेले.
व आज रोजी रात्री सलमान कोंढवा येथे येणार असलेबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी हत्यारासह थांबुन
होतो असे सांगितले.
त्यांचेविरुद्ध कोंढवा पोलीस ठाणे येथे गु र नं ६४/२०२३ भादवि कलम १२० (ब). ११५, सह आर्म अॅक्ट
४ (२५).म.पो.का. कलम ३७ (१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वर नमुद ताब्यातील आरोपी व
विधीसंघर्षित बालक यांना पुढील तपासकामी कोंढवा पोलीस ठाणेचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णिक
सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रामनाथ पोकळे – अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री अमोल झेंडे
पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री गजानन टोम्पे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर
यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस उप-निरीक्षक सुनिल
कुलकर्णी, अजय जाधव, पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, अभिनव लडकत, अय्याज दड्डीकर, इम्रान शेख,
तुषार माळवदकर, विठ्ठल साळुंखे, महिला पोलीस अंमलदार रुक्साना नदाफ यांचे पथकाने केली आहे.