• April 24, 2026
  • No Comment

गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    प्रतिनिधी : सचिन गाडे

    पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित झाली. सन २०२६ ते २०२९ या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे.

    या निवडणुकीत मार्केटयार्ड विकास पॅनलचे सर्व १७ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. कांदा-बटाटा विभागातील चार जागांसाठी चारच अर्ज आल्याने रोहन जाधव, संजय वखारे, दीपक कानडे आणि मोला (चांदसाहेब) भोळे यांची निवड निश्चित झाली. तसेच भाजीपाला विभागातील आठ जागांसाठी आलेल्या अर्जांमध्ये अनिकेत घोडके, संतोष कुंभारकर, संदीप कटके, नामदेव निकम, महेश शिर्के, राजेंद्र सूर्यवंशी, सागर केदारी आणि राहुल भोसले यांचा समावेश आहे.

    दरम्यान, केळी विभागात मात्र निवडणूक रंगणार असून एका जागेसाठी गणेश वायकर आणि फिरोज हाजी सांचे यांच्यात थेट लढत होणार आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत मतदान होणार असून त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. तानाजी शिवाजीराव मंगळे व सहायक अधिकारी संतोष धारणे यांनी दिली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *