• April 27, 2026
  • No Comment

हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    प्रतिनिधी : सचिन गाडे
    पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. मेंगडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.
    या निवडणुकीत हमाल पंचायत एकनिष्ठ पॅनेल आणि परिवर्तन पॅनेल यांच्यात थेट सामना झाला होता. मात्र, एकनिष्ठ पॅनेलने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
    अध्यक्षपदी गोरख मेंगडे यांच्यासह उपाध्यक्षपदी विष्णू गर्जे , दत्तात्रय डोंबाळे आणि सोपान धायगुडे यांची निवड झाली. तसेच सरचिटणीसपदी अंकुश अवताडे, खजिनदारपदी चंद्रकांत मानकर यांची निवड झाली आहे. सहचिटणीसपदी मंगेश फुंदे , विनोद शिंदे, अरुण डोलारे आणि वत्सला गवळी हे निवडून आले आहेत.
    आठ पदांसाठी झालेल्या या निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलने सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय संपादन केला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *