- January 26, 2023
- No Comment
अश्लील फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार
पुणे : एकाच ठिकाणी राहत असलेल्या तरुणीला प्रेमात पाडून तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाणेर येथील २२ वर्षीय तरुणीने चतुशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिल्लीतील मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे २०२२ पासून सुरू होता.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकाजवळ राहत होते. आरोपींनी फिर्यादीशी जवळीक साधून मैत्री केली. तिचा विश्वास संपादन करून मैत्रीचे प्रेमात रूपांतर केले. तिला कामानिमित्त रूमवर बोलावले. तू मला खूप आवडतेस, तू खूप सुंदर आहेस, तू माझी नाही तर कोणाची होणार नाही, असे बोलून शारीरिक संबंध जोडले. तसेच फिर्यादीचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी बलात्कार केला.