• January 6, 2023
  • No Comment

अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे स्टेशन परिसरात पकडले.

    पुणे : अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे स्टेशन परिसरात पकडले. दोघांकडून १६ लाख ३२ हजार रुपयांचे एक किलो ८८ ग्रॅम चरस, दोन मोबाइल संच, दुचाकी असा १८ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    या प्रकरणी अमिर मसिउल्ला खान (वय २४, सध्या रा. यासीन अपार्टमेंट, ताडीवाला रस्ता, मूळ रा. गंज दुडवारा, जि. कासगंज, उत्तरप्रदेश), अतुल गौरव वानखडे (वय २२, सध्या रा. यासीन अपार्टमेंट, ताडीवाला रस्ता, मूळ रा. तथागतनगर, खामगाव, जि. बुलढाणा) यांना अटक करण्यात आली.


    खान आणि वानखडे पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्ता परिसरात चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पाेलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून चरस जप्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, उपनिरीक्षक एस. डी. नरके, संतोष देशपांडे, युवराज कांबळे, योगेश मांढरे, संदीप जाधव आदींनी ही कारवाई केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *