तो विडिओ वायरल झाला,चक्क एकनाथ शिंदे उभे आणि गुंड शरद मोहोळ बसलेला,आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
- देश
- September 20, 2022
- No Comment
पुणे: पुण्यात काय होईल ते सांगताच येणार नाही.सध्या सोशल मिडियावर एक विडिओ वायरल होत आहे. त्या विडिओ मध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ हा बसलेला आहे व एकनाथ शिंदे हे उभे आहेत. या बाबत सविस्तर खुलासा असा कि,मुख्यमंत्री शिंदेसारखी दिसणारी व्यक्ती ही विजय माने ही आहे.विजय माने हा हुबेहुब एकनाथ शिंदे सारखी दिसत असुन तिचा पेहराव ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमाणे आहे.ही व्यक्ती सोशल मिडीयावर सतत काही ना काही टाकत असते.गणपतीच्या काळात हिला सेलेब्रिटी सारखी वागणूक मिळत होती.म्हणतात ना देव देतो आणि कर्माने जाते या उक्तीनुसार माने अडचणीत आला.गुंड शरद मोहोळ सोबत विडिओ वायरल झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिमा मलीन केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पुणे पोलीस करीत आहेत.