• November 10, 2022
  • No Comment

प्रेमप्रकरणातून तरुणीचा धारधार शस्त्राने वार करून खून,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेमप्रकरणातून तरुणीचा धारधार शस्त्राने वार करून खून,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे: पुण्यातील औंध परिसरात भर दिवसा प्रेम प्रकरणातून एका तरुणीचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला.

    तीक्ष्ण शस्त्राने वार केल्यानंतर आरोपीने पळ काढला. श्वेता रानवडे (वय 22, रा. औन्ध) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात प्रतीक ढमाले याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणी आणि आरोपी यांच्यात मागील काही वर्षापासून प्रेम संबंध होते. दोघांचे कुटुंब देखील एकमेकांना ओळखत होते. दोन्ही कुटुंबाने त्यांचा विवाह देखील ठरला होता. मात्र काही दिवसांनी प्रतीकची वर्तणूक चांगली नसल्याचे श्वेताच्या लक्षात आले होते. त्यामुळे तिने त्याच्या सोबतचे सर्व संबंध तोडून टाकले होते. तर ठरलेले लग्नही मोडले होते. दरम्यान यानंतरही प्रतीक तिचा पाठलाग करत होता. लग्नासाठी तिला गळ घालत होता. मात्र ती त्याला जुमानत नव्हती.

    दरम्यान याच रागाच्या भरात आज दुपारच्या सुमारास प्रतीक श्वेताच्या घराजवळ आला. तिला खाली बोलावले. दोघे सोसायटीच्या पार्किंगमध्ये बोलत होते. यावेळी त्यांच्यात वाद झाले. यावेळी प्रतिकने याने सोबत आणलेल्या चाकूने तिच्या गळ्यावर सपासप वार केले. श्वेता रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तो पसार झाला.

    अचानक झालेल्या या घटनेने रहिवासी व इतर नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी पोलिसांना ही माहिती देत श्वेता हिला रुग्णालयात दाखल केले. पण, तिचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. पसार झालेल्या प्रतीकचा पोलीस शोध घेत असून, पुढील तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *