• November 11, 2022
  • No Comment

पावणे तीन लाखांचे अंमली पदार्थ जप्त,अंमली पदार्थ विरोधी पथक दोन यांची कामगिरी

पावणे तीन लाखांचे अंमली पदार्थ जप्त,अंमली पदार्थ विरोधी पथक दोन यांची कामगिरी

    पुणे: फरासखाना व बंडगार्डन येथे आज (दि.10) या एकाच दिवशी पावणे तीन लाखांचे आंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक 2 यांनी केली आहे.

    यामध्ये पोलिसांनी जाहिदुल मोतेहर मलीक उर्फ आकाश मंडल (वय 24 रा.बुधवारपेठ), अलफहाद वजीर सय्यद (वय 27 रा.पुणे कॅम्प) व शहारुख बाबु शेख (वय 29 रा. कोंढवा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक पोलिसांच्या तपासी पथकाला गस्त घालत असताना फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रांती चौक येथे मंडल हा संशयीतरित्या उभा असल्याचे पोलिसांना कळले. त्यानुसार पोलिसांनी मंडल याला ताब्यात घेत त्याच्याकडून 76 हजार रुपयांचे 38 ग्रॅम मॅस्केलाईन अंमली पदार्थाच्या 38 गोळ्या 10 हजार रुपायांचा मोबाईल असा एकूण 86 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

    बंडगार्डन येथील कारवाईमध्ये पुणे स्टेशन परिसरात मोपेडवरून दोन इसम संशयीत रित्या फिरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता 2 लाख रुपयांचा 10 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ 40 हजार रुपयांची दुचाकी, 20 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण 2 लाख 60 हजार रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात फरासखाना व बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *