• November 11, 2022
  • No Comment

तरुणीचा खून करून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणीचा खून करून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    औंध: पुण्यातील औंध परिसरात पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा खून करून पसार झालेल्या तरुणाने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. मुळशीतील टाटा डॅमजवळील जंगलात जाऊन त्याने गळफास घेतला.

    प्रतीक किसन ढमाले (वय 27, रा. कडुस, राजगुरूनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक ढमाले हा उच्चशिक्षीत होता. त्याचे व खून झालेल्या श्वेता रानवडे यांचे प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला होता. त्याबाबत कुटूंबाना माहिती दिली होती. दोन्ही कुटूंबाने त्यांचा विवाह देखील ठरवला होता. परंतु, दोघांमधील प्रेमसंबंध सुरू असतानाच प्रतीकच्या वागण्यामुळे तिने प्रेमाला व लग्नाला नकार दिला. त्यानंतर त्यांचे लग्न मोडले होते. पण, तरीही प्रतीक तिला लग्नाबाबत विचारणा करत होता व तिच्याकडे हट्ट धरत होता. प्रतीकने आत्महत्या करण्याची धमकी देखील श्वेताला दिली होती.

    दरम्यान, बुधवारी दुपारी श्वेता सोसायटीच्या पार्किंगमध्ये दुचाकी लावत असताना प्रतिकने तिचा चाकूने सपासप वारकरून खून केला. त्यानंतर तो पसार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. पथक प्रतिकचा शोध घेत असताना गुरूवारी सकाळी मुळशी भागातील टाटा डॅम परिसरात प्रतीकची दुचाकी रस्त्याच्या कडेला दिसली.

    पोलिसांनी धरण परिसरातील झाडांमध्ये त्याचा शोध घेण्यास सुरूवात केल्यानतंर त्याने एकेठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर या आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

     

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *